गणेशोत्सव, दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या प्रयत्नाने दोन्ही उत्सव समन्वय समिती व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह होणार बैठक

मुंबई : दहीहंडी व गणेशोत्सव आयोजनातील अडचणींवर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घ्यावी, अशी विनंती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली होती. त्यानुसार आज (6 जुलै) ही महत्त्वाची बैठक होणार आहे.

मुंबईतील दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांत संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत अनेक मंडळे व दोन्ही उत्सवांच्या समन्वय समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी पत्र लिहूनही तातडीची बैठक घेण्याची मागणी केली होती..

ही बैठक आज (6 जुलै) दुपारी 2 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीला आमदार अॅड आशिष शेलार यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, संबंधित विभागांचे प्रधान सचिव, महाधिवक्ता, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, गणेशोत्सव आणि दहीहंडी मंडळ यांच्या समन्वय समिती, महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे ही बैठक महत्वाची ठरणार आहे.