उमरखाडीच्या राजाचे वरुणाच्या वर्षावात जल्लोषात आगमन  

दिनेश मराठे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मिरवणुकीत ढोल ताशा पथक, बँजो आणि डॉल्बीच्या संगीतावर भर पावसात तरुणाई थिरकली. ही शान कोणाची उमरखाडीच्या राजाची या जय घोषात मिरवणूक मार्गस्थ होत असताना जवळपास दहा ते बारा हजारांच्या भक्तांच्या समुहाने बाप्पाला वाद्यांच्या संगीतावर आनंदाने नाचत गात आणले.

मुंबादेवी : आज रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत दक्षिण मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा "देव माझा उमरखाडीचा राजा" गणरायाची मिरवणूक परळ येथील नरे पार्क चित्र शाळेतून निघाली आणि उमरखाडीत मंडपात पोहचण्यास तब्बल 8 ते 9 तास लागले.

मिरवणुकीत ढोल ताशा पथक, बँजो आणि डॉल्बीच्या संगीतावर भर पावसात तरुणाई थिरकली. ही शान कोणाची उमरखाडीच्या राजाची या जय घोषात मिरवणूक मार्गस्थ होत असताना जवळपास दहा ते बारा हजारांच्या भक्तांच्या समुहाने बाप्पाला वाद्यांच्या संगीतावर आनंदाने नाचत गात आणले. तरुणाईच्या जल्लोषात मुलींनी महिलांसह आपला उत्साह दाखविला. डोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी 10:00 वाजता मिरावणुकीत वाद्य वाजविण्यास मज्जाव केल्याने लोकांचा हिरमोड झाला.

परंतु कायदे आणि नियम पाळा आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन बागड़ीकर, शशिकांत पाडावे, उपनिरीक्षक सचिन पालवे,संग्राम कदम यांनी करीत पोलिस पथकासह आगमण मिरवणूक रात्री 1:00 वाजता शांततेत पार पाडली.

मुंबई

कोपरखैरणे -  सध्या नवी मुंबईत सर्वत्र साथींच्या रोगांनी थैमान घातल्याने पालिका आपल्या परीने उपाययोजना करीत आहे. मात्र,...

04.18 AM

नवी मुंबई - फिफा वर्ल्डकपच्या तयारीची कामे नवी मुंबईत सध्या वेगाने सुरू आहेत. या स्पर्धेतील फुटबॉलचे मुख्य सामने डॉ. डी. वाय...

03.48 AM

नवी मुंबई  - वाशी भागात हरित क्षेत्रविकास करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला असून त्यासाठी दोन कोटी तीन लाख...

03.24 AM