अपघातानंतर मैत्रिणीला रुग्णालयात सोडून पळ

अपघातानंतर मैत्रिणीला रुग्णालयात सोडून पळ

तरुणीचा मृत्यू; एकास अटक, एक फरारी
मुंबई - एकाच दुचाकीवरून ट्रीपल सीट जात असताना झालेल्या अपघातात मैत्रीण गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रिक्षाचे भाडे देऊन येतो, असे सांगून तिच्या मित्राने पळ काढला. उपचारादरम्यान जखमी तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दुचाकीचालकास अटक केली. मोहंमद हाशीम चौधरी असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचा मित्र फरारी आहे.

राफिया फकरेआलम खान (वय 20) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती गोवंडी परिसरात राहायची. तिची फरारी आरोपीसोबत पाच महिन्यांपासून मैत्री होती. दोघेही घाटकोपर परिसरात भेटायला यायचे. गुरुवारी रफिया फरारी आरोपीला भेटण्याकरिता आरे परिसरात आली होती. त्या वेळी तिने घरी जाण्यास नकार दिला. आरोपीने चौधरी याला फोन करून आरे कॉलनी परिसरात बोलावले. त्यानंतर रफियासह तिघेही दुचाकीने सहारच्या दिशेने जात होते. चौधरी दुचाकी चालवत होता. सायंकाळी ते सहारगाव परिसरात पोचले. त्या वेळी चौधरीला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अपघात झाला. यात राफिया दुचाकीवरून पडली. त्या वेळी एका विमान कंपनीच्या बसने राफियाला चिरडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने सहार पोलिसांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com