गोविंदा पथके शोधताहेत चौदा वर्षांवरील "एक्‍या'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - न्यायालयाने 14 वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यास मनाई केल्याने 14 वर्षांवरील सडपातळ "एक्‍या'ची (शेवटच्या थरावरील गोविंदा) शोधाशोध सर्वच दहीहंडी पथकांनी सुरू केली आहे.

मुंबई - न्यायालयाने 14 वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यास मनाई केल्याने 14 वर्षांवरील सडपातळ "एक्‍या'ची (शेवटच्या थरावरील गोविंदा) शोधाशोध सर्वच दहीहंडी पथकांनी सुरू केली आहे.

दहीहंडी केवळ आठवड्यावर आल्याने पथकांच्या सरावाचा जोर वाढला आहे; मात्र खरा पेच आहे तो "एक्‍या'चा. सर्वांत वरच्या थरावरील या गोविंदाचे वजन आणि उंची कमी असेल, तर खालच्या थराला त्याचे वजन सहज पेलता येईल, हे गृहीत धरून गोविंदा पथकांनी 14 वर्षांवरील कमी वजनाच्या गोविंदाचा शोध सुरू केला आहे. गेल्या वर्षी खालच्या थरावर असलेल्या गोविंदाला यंदा दहीहंडी फोडावी लागणार आहे; मात्र दुसऱ्या फळीतल्या आणि पहिल्या फळीतल्या गोविंदाच्या मानसिकतेमध्ये फरक पडतो. सर्वांत वरच्या थरावर चढवण्यासाठी त्यांची कसून तयारी करून घ्यावी लागते, त्यांची मानसिकता तयार करावी लागते. यंदा त्याबाबतच्या सरावाला कमी वेळ मिळाल्याची खंत माझगाव ताडवाडीचे प्रशिक्षक अनिल पाटील यांनी व्यक्त केली. यंदा 14 वर्षांवरील कमी उंचीच्या आणि सडपातळ गोविंदा सर्वच पथकांना हवे आहेत. मोठ्या पथकांमध्ये गोविंदांची संख्या जास्त असल्याने त्यात असे गोविंदा असतात; परंतु छोट्या पथकांना एक्‍याच्या शोधासाठी वणवण करावी लागत असल्याचे दहीहंडी पथकांच्या प्रमुखांनी सांगितले.

टॅग्स