मुंबईला मलेरिया, हेपेटायटीसचा धोका; मलेरियाने 2, हेपेटायटीसने 1 मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

जानेवारीपासून स्वाईन फ्लूचे एकूण बळी – 18

 आजार                  रुग्ण              मृत्यू

मलेरिया                 752                 02

स्वाईन फ्लू               413              07

गॅस्ट्रो                      1010                   -

हेपेटायटीस (काविळ)  134              01

लेप्टोस्पायरोसिस          59         03

डेंगी                         70           -

कॉलरा                     1           0

मुंबई महाराष्ट्रात आणि मुंबईत मलेरिया आजार कमी झाल्याचा आरोग्य खात्याचा दावा फोल ठरताना दिसत आहे. यंदा मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे. त्याबरोबर दोन मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या मोसमात पहिल्यांदा मलेरियाच्या मृत्यूची नोंद जुलैमध्ये करण्यात आली आहे. मुंबईत दोघांचा मलेरियाने मृत्यू झाला आहे. तर एका सात महिन्यांच्या गरोदर मातेचा हेपेटायटीसने मृत्यू झाला आहे. मलेरियासह दूषित पाणी आणि अन्नामुळे होणारे हेपेटायटीस (काविळ)गॅस्ट्रो, कॉलरा आजाराचीही साथ असल्याने मुंबईकरांनी सावध राहिलं पाहिजे.

स्वाईन फ्लू, लेप्टोबरोबर आता मुंबईत मलेरिया आणि हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलै 2016 मध्ये मलेरियाचे 583 रुग्ण आढळले होते तर मृत्यू झाला होता. यंदा जुलैमध्य 752 रुग्ण आढळले असून 2 मृत्यूंची नोंद झाली आहे. जोगेश्वरी (पश्चिम) येथी 26 वर्षाचा पुरुष आणि घाटकोपर (पूर्व) येथील 45 वर्षांची महिला यांचा मृत्यू झाला आहे. जोगेश्वरी येथील रुग्णाने सुरुवातील केमिस्टच्या दुकानातून औषध घेतले, त्यानंतर खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. फरक न पडल्याने रुग्णाला सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागले. तापामुळे प्लेटलेट्स आणि हिमोग्लोबिन कमी झाले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान तीन दिवसांनंतर मृत्यू झाला. तर, घाटकोपर येथील महिला रुग्णाने ताप, अंगदुखी आणि अशक्तपणा असताना पाच दिवस दुखणे अंगावर काढले. सरकारी रुग्णालयात केलेल्या रक्तचाचणीत मलेरिया तापाचे निदान झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन दिवसातच या महिलेचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त मुंबईत डेंगी सदृश तापाचे 653 तर, डेंगीचे 70 रुग्ण आढळले आहेत.

जुलैमध्ये हेपेटायटीसचे (काविळ) 135 रुग्ण आढळले तर एका मृत्यूची नोंद करण्यात आली. कुर्ला येथे राहणाऱ्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात (जुलै) या महिलेला मळमळ आणि ताप होता. खासगी डॉक्टरकडे ही महिला उपचार घेत होती. उपचारांदरम्यान तिला काविळ झाल्याचे निदान झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. 13 जुलै उपचारांदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला हेपेटायटीस ए आणि ई असे दोन्ही संसर्ग झाले होते.  गॅस्ट्रोचे जुलैमध्ये 1010 रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी असला तर बाहेरच अन्न आणि दूषित पाणी टाळणे जास्त योग्य असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.  

 मलेरिया आणि  हेपेटायटीसचा धोका वाढत असताना स्वाईन फ्लू आणि लेप्टचे रुग्णही आढळत आहे. महापालिकेच्या आरोग्यविभागासमोर ज्याने पाच आजारांचे आव्हान आहे. स्वाईन फ्लने जुलै मध्ये जणांचा बळी घेतला आहे. तर, लेप्टोने मृत्यूंची नोंद झाली आहे.