पुरवणी मनाईला हायकोर्टाची स्थगिती

पुरवणी मनाईला हायकोर्टाची स्थगिती

मुंबई - परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना पुरवणी किंवा अतिरिक्त उत्तरपत्रिका देण्यास मनाई करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी हंगामी स्थगिती दिली. विद्यार्थ्यांनी पुरवणी मागितली तर त्यांना द्या, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. विधी शाखेच्या परीक्षांना शनिवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

विद्यापीठाच्या निर्णयाला विधी शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरील सुनावणीदरम्यान न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने याबाबत विद्यापीठाला खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. ऑनलाईन पेपर तपासणीच्या कामात उत्तरपत्रिकेचा बारकोड निश्‍चित असतो; मात्र पुरवणीचा बारकोड वेगळा असल्यामुळे पेपर तपासताना गोंधळ होतो. त्यामुळे ही मनाई केल्याचा दावा विद्यापीठाने केला होता. तो खंडपीठाने फेटाळला.

अशा प्रकाच्या मनाईमुळे विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळविण्यात अडचण येऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास पुरवणी द्यायलाच हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. विद्यापीठाच्या गोंधळात टाकणाऱ्या अनेक निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होतो. याबाबत न्यायालयात याचिका येतात, अशी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत वाढवली. विद्यापीठातील निकाल गोंधळामुळे ही मुदत वाढवण्याची मागणी विधी शाखेतील विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com