दिवाळीत घर खरेदीला अल्प प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - नोटाबंदी, "रेरा' आणि "जीएसटी'चा परिणाम गृहप्रकल्पांवर झाला आहे. यामुळेच यंदा दिवाळीमध्ये ग्राहकांनी घर खरेदीकडे काही प्रमाणात पाठ फिरवली. यंदा दिवाळीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 25 टक्केच घर खरेदी झाल्याचा दावा बिल्डर्स असोसिएशनने केला आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. त्यापाठोपाठ रेरा कायदा लागू करण्यात आला. या दोन्हींचा गृहनिर्माण क्षेत्रावर विपरित परिणाम झाला. या धक्‍क्‍यातून हळूहळू सावरत असलेल्या गृहनिर्माण क्षेत्राला पुन्हा जीएसटीचा फटका बसला. घर खरेदीला दिवाळीचा मुहूर्त साधला जातो; पण यंदा घर खरेदीकडे देशभरातील ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नोटाबंदी, "रेरा' आणि "जीएसटी'मुळे विकसकांनी नवीन प्रकल्प जाहीर केले नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ 25 टक्केच घरांची विक्री झाल्याचा दावा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रवक्ते आनंद गुप्ता यांनी केला आहे.