आयआयटीच्या विद्यार्थ्याला सव्‍वा कोटीचे पॅकेज

आयआयटीच्या विद्यार्थ्याला सव्‍वा कोटीचे पॅकेज

मुंबई - मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर निर्मितीतील नामांकित कंपनीने मुंबईतील आयआयटीच्या एका विद्यार्थ्याला तब्बल एक कोटी ३८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. दोन वर्षांतील हे सर्वांत मोठे पॅकेज असून, यंदा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुंबई आयआयटीकडे रांगा लागल्या आहेत. उबरने ९९ लाखांचे पॅकेज दिले आहे; मात्र याला दुजोरा मिळाला नाही.

आयआयटी मुंबईचे कॅम्पस सिलेक्‍शन शुक्रवारपासून सुरू झाले आहे. शुक्रवारी मायक्रोसॉफ्टने चार विद्यार्थ्यांना अंतिम मुलाखतीसाठी निवडले होते. त्यातील एकाला तब्बल एक कोटी ३८ लाखांचे पॅकेज दिले आहे. भारतातील विभागासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला ३९ लाखांचे पॅकेज मायक्रोसॉफ्टने दिले आहे. ब्लॅकस्टोन या अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीने भारतात सर्वाधिक म्हणजे ४५ लाखांचे पॅकेज दिले आहे. उबरने अमेरिकेत काम करण्यासाठी एका विद्यार्थ्याला ९९ लाखांचे पॅकेज दिले असल्याचे समजते. तब्बल २५० कंपन्यांनी आयआयटीत प्लेसमेंटसाठी नोंदणी केली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा कंपन्यांची संख्या वाढण्याबरोबरच पगाराचा आकडाही वाढला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात मायक्रोसॉफ्ट आणि जपानच्या एनईएस या कंपन्यांनी परदेशात काम करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांची निवड केली आहे. 

इस्रोसाठीही निवड 
भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशननेही आयआयटी कॅम्पसमध्ये सहभाग घेतला होता. या सरकारी संस्थांनी १३ विद्यार्थ्यांची निवड केली. मात्र, त्यांना देण्यात आलेल्या पॅकेजबाबत माहिती मिळू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com