बेकायदा कीटकनाशके, खतविक्री विरोधात कारवाई

बेकायदा कीटकनाशके, खतविक्री विरोधात कारवाई
मुंबई - बेकायदा कीटकनाशकांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने राज्यभर भरारी पथकांच्या माध्यमातून कार्यवाही केली आहे. अकोला, सांगली, जळगावसह राज्यातील विविध भागांमध्ये केलेल्या कार्यवाहीनंतर विनापरवाना तसेच कालबाह्य कीटकनाशके, रासायनिक खते विक्री करणाऱ्या दुकानांवर तसेच उत्पादन कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साधारणत: 2 कोटी 23 लाख रुपये किमतीच्या कीटकनाशकांच्या अवैध साठ्याची जप्ती करण्यात आली आहे. हा साठा साधारणतः 20 हजार 771 लिटर आहे, अशी माहिती निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप यांनी दिली. राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यभर कृषी आयुक्तालय स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. कारवाईत कृषी रसायन एक्‍स्पर्ट प्रा. लि., केमिनोव्हा इंडिया प्रा. लि., एफएमसी इंडिया प्रा. लि., बायोस्टॅड्‌ट इंडिया कंपन्यांचा एकूण 197.52 लाख रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा विक्री बंद किंवा जप्त करण्यात आला आहे. तसेच भारत इन्सेक्‍टीसाइड, मे. रेनबो क्राप हेल्थ या कंपन्यांच्या गोदामातून एकूण 26 लाख 66 हजार रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. हा साठा साधारणतः 20 हजार 771 लिटर इतका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com