जितेंद्र आव्हाडांची "टाळेबाजी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी (ता. 7) रात्री 11.30 वाजता कलिना विद्यापीठातील बंद प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याची स्टंटबाजी केली. सुरक्षारक्षकांनी त्वरित हे टाळे काढले.

पाच ऑगस्टपर्यंत सर्व विद्या शाखांचे निकाल न लावल्यास मुंबई विद्यापीठाला टाळे ठोकणार, असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी सोमवारी रात्री कोणतीही पूर्वकल्पना न देता ही स्टंटबाजी केली. कलिना विद्यापीठाच्या हॉटेल हयातजवळील बंद प्रवेशद्वारालाच आव्हाड यांनी टाळे ठोकले. मुख्य प्रवेशद्वाराऐवजी बंद प्रवेशद्वारालाच टाळे ठोकल्याने आव्हाड यांची ही स्टंटबाजी दिवसभर चर्चेत होती. या घटनेनंतर विद्यापीठातील मुख्य केंद्रांवर सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.