मुसळधार पावसामुळे सराव करायचा कुठे- ढोल ताशा पथकांपुढील प्रश्न

रविंद्र खरात 
शुक्रवार, 14 जुलै 2017

केवळ सणापुरता ढोल ताशा पथक वाजविने राहिले नसून प्रत्येक महिन्यात कार्यक्रम असल्याने ढोल ताशा पथकाना सराव करण्यासाठी जागा नसून मुसळधार पाऊसही पड़त असल्याने सराव करायचा कसा हा कल्याण पूर्व मधील ढोल ताशा पथका समोर प्रश्न निर्माण झाला आहे.

कल्याण : केवळ गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी पहाट कार्यक्रमापुरते ढोल ताशा वाजवून नागरिकांचे मनोरंजन करायचे. मात्र आता केवळ सणापुरता ढोल ताशा पथक वाजवणे राहिले नसून, प्रत्येक महिन्यात कार्यक्रम असल्याने ढोल ताशा पथकांना सराव करण्यासाठी जागा नसून मुसळधार पाऊस ही पड़त असल्याने सराव करायचा कसा हा कल्याण पूर्वमधील ढोल ताशा पथका समोर प्रश्न निर्माण झाला आहे . 

केवळ चौकात उभे राहून ढोल ताशा वाजवून मनोरंजन करण्यापेक्षा सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने कल्याण पूर्व मधील रूपेश गायकवाड़ यांनी 12 युवक आणि 12 ढोल घेवून कल्याण पूर्व बासरीवाला आधुनिक ढोल ताशा पथक... एक चळ वळ... 15 फेब्रुवारी 2014 रोजी सुरू केला.

उच्चशिक्षित युवक आणि युवती एकत्र येऊन पथकाची निर्मिती झाली, राज्यातील अनेक शहरात हे ढोल ताशा पथक गेले. बघता बघता पथकात 67 युवक युवती 30 ढोल, 10 ताशे झाले. यातील मुंबई, ठाणे, आणि कल्याण मधील हे रहीवाशी आहेत . विशेष म्हणजे जे वर्षभरात ढोल ताशे वाजवून जे पैसे मिळतात तो सर्व पैसा एकत्र करून सामाजिक कामासाठी वापरला जातो . 

आता हा व्यवसाय सणापुरता न राहता प्रत्येक महिन्यात यांना ऑडर मिळत असल्याने सराव करायला जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे , कल्याण पूर्व मध्ये मैदान आहेत मात्र बाजूला नागरिक राहत असल्याने ढोल ताशे वाजविताना आवाजाचे बंधन येते , यामुळे हे पथक कल्याण  नोकरी आणि व्यवसाय सांभाळुन हे युवक आणि युवती कल्याण पूर्व मधील रेल्वे वसाहत च्या मैदान मध्ये दर रविवारी सराव करतात मात्र आता पाऊस सुरु झाला असून तेथे सायंकाळी काळोख्यात सुरक्षेचा प्रश्न ही निर्माण झाल्याने सराव करायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे . पुढील महिन्यापासून सण आणि उत्सव सुरु होत असल्याने सराव तर करायचा आहेच यामुळे 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान बदलापुर मध्ये तीन दिवस राहत सराव करण्यात येणार आहे . 

या वर्षी आम्ही मराठी सण आणि मराठी मन ..एक दिवा सैनिकासाठी ही थीम घेवून जनते समोर जाणार आहोत , कल्याण पूर्व मध्ये जागेचा प्रश्न आणि पावसामुळे आमचा सराव होत नाही अशी खंत व्यक्त करत  यामुळे आम्ही थांबणार नसून  पुढील महिन्यात बदलापुर मध्ये एका शिबिराचे आयोजन करत त्यात सराव करणार आहोत, कल्याण पूर्व बासरीवाला ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष रूपेश गायकवाड़ यांनी दिली.