स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्या पालिकेतच भंगार

मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण

कल्याण : पावसाळा आला किंवा त्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका गाजावाजा करत नागरिकांना आवाहन करत असते. स्वच्छतेबाबत आवाहन करते, तसेच सध्या पालिका हद्दीत स्वच्छता मोहीम राबवत आहे. मात्र, पालिका मुख्यालयाच्या दोन्ही इमारतीमध्ये भंगार साचले असून, तेथे येणाऱ्या नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी वर्ग खरच सुरक्षित आहेत का असा सवाल केला जात असून, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था पालिकेची झाल्याची चित्र समोर आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय मधील लेखा विभाग मधील महिला अधिकारी श्वेता सिंहासने यांचा डेंग्यू ने मृत्यू झाल्यावरही पालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा संताप नागरिक करत आहेत, पावसाळा किंवा त्यापूर्वी साथीचे आजार पसरू नये म्हणून नागरिकांना पालिका अनेक आवाहन करत असते घरा जवळ कचरा साचू देऊ नये, पाण्याचा निचरा होऊ द्या, भंगार साचू देऊ नका, पाणी स्वच्छता ठेवा असे अनेक आवाहन केले जातात.  

पालिका मुख्यालय भंगाराचे साम्राज्य...
लोकप्रतिनिधी असो, पालिका विभाग अधिकारी यांचे दालन सुशोभीकरण केले जाते, जुने साहित्य बाहेर काढतात नवीन फर्निचर आत आणले जाते. क्लास वन अधिकारी वर्गाची केबिन चकाचक मात्र कर्मचारी मात्र इमारतीच्या कोण्यात बसून काम करताना दिसत आहे. कागदपत्र ठेवायला जागा नसल्याने कपाटाच्या वरती ठेवली जात आहे. तर आरोग्य विभागाच्या जुन्या इमारती वर घाणीचे साम्राज्य असून जुनाट इमारतीच्या डागडुजी आणि रंग रंगोटी च्या फाईली धूळखात पडल्याने कर्मचारी वर्गाचे खरच आरोग्य सुरक्षित आहे असा सवाल केला जात आहे.

ताळमेळ नाही...
साथरोग पसरल्यास वैद्यकीय आरोग्य विभागावर खापर फोडले जाते मात्र पाणी पुरवठा, घनकचरा विभाग, फेरीवाला विरोधी पथक, नगररचना विभाग, प्रभाग क्षेत्र कार्यालय, बांधकाम विभागावर कोणीच काही बोलत नाही असा सवाल केला जात आहे ? 1 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत वडा पाव विक्री ते पाणी पुरी विक्री रस्त्यावर होऊ नये त्यावर कारवाई झाली पाहिजे मात्र आजमितीस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दूषित पाणी, घाणीचे साम्राज्य, खड्डेमय रस्ते आदी विषयावर चर्चा किंवा पालिका अनेक विभागात तालमेळ नसल्याचे समोर आले आहे.

त्या त्या विभागातील भांगाराची विल्हेवाट लावणे त्या विभागाची जबाबदारी आहे. पालिका मुख्यालयामध्ये वेळोवेळी फवारणी केली जाते, राहिला प्रश्न भांगाराचा प्रश्न त्याची निविदा अंतिम टप्यात आहे अशी माहिती पालिका सहायक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी दिली.