कांदिवलीत 22 लाखांचा अमलीपदार्थ जप्त
मुंबई - धुळे येथून कांदिवलीत अमलीपदार्थ घेऊन आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नितीन म्हादू शेगावकर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 110 किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या अमलीपदार्थाची किंमत 22 लाख रुपये आहे.

एक व्यक्ती धुळ्याहून मोठ्या प्रमाणावर गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस उपायुक्त (अमली पदार्थविरोधी कक्ष) शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण कदम यांच्या पथकाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात सापळा रचला. या पथकाने तेथे आलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीची झडती घेतली असता आत 110 किलो गांजा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला.