एलएलबीची परीक्षा फेब्रुवारी 2018 मध्ये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई  - मुंबई विद्यापीठाच्या निकाली गोंधळात या वर्षी एलएलबीच्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. एकीकडे निकाल न लागल्याने एलएलबीची प्रवेशप्रक्रिया रखडली होती. शनिवारी (ता. 7) प्रवेशाची पहिली यादी लागली. त्यामुळे परीक्षा फेब्रुवारी 2018 मध्ये होणार असल्याने विद्यार्थी चांगलेच हैराण झाले आहेत. 

नावनोंदणी प्रक्रियेतून विद्यार्थी वगळले जाऊ नयेत, याकरिता उच्च तंत्र संचालनालयाने सात वेळा मुदतवाढ दिली. एलएलबीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, याकरिता तीन विद्यार्थी उच्च न्यायालयातही गेले होते. अखेर 30 जुलैला रात्री विद्यापीठाने घाईघाईने निकाल जाहीर केला. या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांची कशीबशी एलएलबी प्रवेशासाठी नावनोंदणी झाली. त्यातून शनिवारी पहिली यादी जाहीर झाली. शेवटची यादी 4 डिसेंबरला जाहीर होणार आहे. नियमानुसार 45 दिवसांनी परीक्षा बंधनकारक असताना आता एलएलबीच्या परीक्षेसाठी फेब्रुवारी उजाडणार आहे. 

संपूर्ण दिवाळी प्राध्यापक-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबवण्यातच जाणार आहे, अशी खंत एलएलबीच्या प्राध्यापकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली. विद्यापीठाच्या गोंधळामुळे एलएलबीच्या विद्यार्थ्यांचे हाल झाले, अशी टीका स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली. 

Web Title: mumbai news llb exam