मल्हार क्रांतीचा मोर्चा स्थगित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मल्हार क्रांती संघटनेतर्फे रविवारी (ता. 4) नवी मुंबईत काढण्यात येणारा मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आहे. मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी ही माहिती दिली. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हा मोर्चा निघणार होता.

आरक्षणाच्या मागणीसाठी मल्हार क्रांती संघटनेमार्फत राज्यात दाखला अर्ज मोहीम राबवली जात आहे. या मागणीसाठी रविवारी नवी मुंबईतील कोकण भवनवर मोर्चा काढण्यात येणार होता. सीबीडी बेलापूर स्थानकापासून या मोर्चाची सुरवात होणार होती; मात्र राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर हा मोर्चा स्थगित केल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.