महापालिका सभांतील निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - महापालिकेच्या सभांमध्ये घेण्यात आलेले निर्णय महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. या निर्णयावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात याव्यात, अशी मागणी समाजवादी पक्षा(सप)ने केली.

मुंबई - महापालिकेच्या सभांमध्ये घेण्यात आलेले निर्णय महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. या निर्णयावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात याव्यात, अशी मागणी समाजवादी पक्षा(सप)ने केली.

सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे विकासकामांवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने ही मागणी केल्याचे "सप'ने म्हटले आहे. महापालिका निवडणुकीवेळी पारदर्शकतेबाबत भाजपने शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे महासभा, स्थायी समिती, विशेष आणि वैधानिक समित्यांच्या सभेची कार्यक्रम पत्रिका व त्यावर घेतलेले निर्णय महापालिकेच्या संकेतस्थळावर नियमित प्रसिद्ध करावेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे.