सरदारगृहात लोकमान्यांचे स्मारक हवे - पुरोहित

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - महात्मा गांधींचे स्मारक मणिभवन येथे आहे, त्याच धर्तीवर लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला तेथे त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी राज पुरोहित यांनी मंगळवारी केली. गिरगाव मुंबई येथील सरदारगृहात लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्‍वास घेतला होता. या मागणीत लक्ष घालण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.