मुंबई: मेट्रोसाठी 'आरे'मधील जागा हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

'आरे' येथील दुग्धवसाहतीतील जमीन महसूल व वन विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मेट्रो 7 प्रकल्पाचे रिसिव्हिंग सबस्टेशन, स्टील यार्ड, लेबर कँपसाठी या जागेचा वापर होणार आहे.

मुंबई - अंधेरी ते दहिसर या 'मेट्रो 7' प्रकल्पासाठी 'आरे'मधील सुमारे 5 एकर जागा नगरविकास विभागाच्या एमएमआरडीकडे हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

'आरे' येथील दुग्धवसाहतीतील जमीन महसूल व वन विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मेट्रो 7 प्रकल्पाचे रिसिव्हिंग सबस्टेशन, स्टील यार्ड, लेबर कँपसाठी या जागेचा वापर होणार आहे. या जागेत मेट्रो भवनही उभारले जाणार आहे.

यापूर्वी मागच्या आठवड्यात मेट्रो कार शेडसाठी 'आरे' मधील जागेचं आरक्षण बदलण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सुधार समितीतला प्रस्ताव शिवसेनेने धुडकावला होता. 'आरे'मध्ये मेट्रो प्रकल्पाच्या परवानगीवरून पुन्हा भाजपचा सेनेला शह देण्याचा प्रय़त्न आहे.