पार्ल्यात रंगलीय खवय्यांची जत्रा

पार्ल्यात रंगलीय खवय्यांची जत्रा
पार्ल्यात रंगलीय खवय्यांची जत्रा

मुंबईः मिसळ म्हटले की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते आणि आपसूकच आपली पावले मिसळ खायला वळतात. उत्तर मुंबईतील पार्ल्यात लोकमान्य सेवा संघ्याच्या मैदानात भरलेल्या मिसळोत्सवास खवय्यांनी तूफ़ान गर्दी करीत महाराष्ट्रातून आलेल्या विविध मिसळ स्टॉलला गराड़ा घालीत लज्जतदार ठसकेबाज मिसळीचा स्वाद घेतला.

पहिल्याच दिवशी तब्बल दोन हजारावर खवय्यानी मिसळीचा आस्वाद घेतला. एक कूपन 70 रुपयांची आहे. लोकांनी शिस्त बद्धपणे 10 स्टॉल समोर रांगा लावीत आपली लज्जत भागविली. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावड़े, आमदार पराग अळवणी, अवधूत गुप्ते, विजय केंकरे यांनी भेट देत घेतला मिसळीचा आस्वाद घेतला. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावड़े यांनी त्यांच्या महाविद्यालयीन विद्यार्थी दशेतील काही मजेशीर आठवणी माध्यमां समोर कथन करीत आपली मिसळ पाव खात विविध बेत आणि आंदोलनाच्या योजना सहकारी मित्रांसह योजल्याचे सांगितले.

जिव्हा तृप्त करणारी लाल भड़क, पिवळी धम्मक, हिरवी, काळी मिसळ. कुणाला आवडणारी तर्री रसाळदार सणसणीत झणझणीत ठसकेबाज तिखट मिसळ अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी लज्जतदार मिसळ खाताना दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या नाका तोंडातून पाणी आले.

मिसळ खाण्यासाठी लहान मुला मुलींनी ख़ास खवय्ये पणा दाखवित आपला आनंद व्यक्त केला. झणझणीत तिखट मिसळीवर लिंबाची फोड़ पिळून त्यात असलेले शेव, मूग, मटकी, पापड़ी, शेव, वटाणा, कांदा, लिंबू यांचा मसाल्याच्या झणझणीत तर्रीसह झालेला सुरेख मिलाप याचा आस्वाद अवर्णनीय आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविनारा असा झक्कास आहे. चुली वरची मिसळ ही उपवासाच्या गरमागरम मिसळी समानच आहे. जैन बांधवांसाठी कांदा-लसून वर्ज्य असलेली मिसळ ही उपलब्ध आहे.

आज आणि उद्या असे दोन दिवस मुंबईतल्या पार्ले टिळक मंदिराच्या मैदानावर मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, संगमेश्वर, पेण, लोणावळा, नाशिक अशा विविध ठिकाणांच्या १२ प्रसिध्द मिसळी एकाच ठिकाणी मुंबईकरांना चाखायला मिळावी, यासाठी मुंबईच्या लोकमान्य सेवा संघाच्यावतीनं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. शेजवानी मिसळ हे या महोत्सावचं खास आकर्षण होतं. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी तब्बल २००० मिसळप्रेमींनी मिसळींचा आस्वाद घेतला. लोकमान्य सेवा संघाच्या महेश काळे, विवेक आचार्य, महादेव भिड़े, उदय तारदळकर, डॉ. रश्मी फडणीस, मनोज निरगुड़कर आणि यशवंत जोशी यांनी या मिसळ म्होत्सवाच्या आयोजनात मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com