महापौरांच्या प्रभागात मनसेचे खळ्ळखट्याक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या प्रभागातच मनसेने रविवारी (ता. 22) फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले. या वेळी पोलिस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.

मुंबई - मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या प्रभागातच मनसेने रविवारी (ता. 22) फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले. या वेळी पोलिस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.

मालाडमध्ये फेरीवाले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संध्याकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांताक्रूझ पूर्व परिसरातील फेरीवाल्यांना हुसकावण्यास सुरवात केली; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यावर तुम्ही फेरीवाले हटवा, असा आग्रह मनसेच्या कार्यकर्त्यांनी धरला. त्यानंतर पोलिसांनीच फेरीवाल्यांना हटवल्याचे वृत्त आहे; परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, घाटकोपर पश्‍चिम येथील खोत लेनवरील फेरीवाल्याने आपल्या गाडीला धक्का लागला म्हणून एका रहिवाशाच्या गाडीची तोडफोड केल्याचे सांगण्यात आले.