दिवसीपोटी दीड लाख मोबाईल क्रमांकाच आधारसाठी अपग्रेडेशन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पोस्टाच्या कार्यालयात आधार अपग्रेडेशन ः दोन हजार कार्यालयात जुलै अखेरीस सुविधा

मुंबई : देशभरात दिवसाला दीड लाख लोकांकडून मोबाईल क्रमांकाचा डेटा अपग्रेड करण्यात येतो. आता पोस्टाच्या माध्यमातूनही ही आधार डेटा अपग्रेडेशनची सुविधा राज्यभरात सुरू झाली आहे. आज या सेवेची सुरूवात मुंबई जीपीओच्या पोस्टाच्या कार्यालयातून झाली. मुंबईसह राज्यातील शंभर ठिकाणी ही सुविधा येत्या दहा दिवसांमध्ये सुरू करण्यात येईल अशी माहिती मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी दिली.

महाराष्ट्रात एकूण 2000 पोस्टाची कार्यालये आहेत. या कार्यालयात आधार डेटा अपग्रेडेशनची सुविधा देण्याचे उदिष्ट येत्या जुलै अखेरीपर्यंत पुर्ण करण्यात येईल असे ते म्हणाले. तसेच लवकरच आधार कार्डची नोंदणीची सुविधादेखील पोस्टाच्या कार्यालयात देण्यात येईल असे ते म्हणाले. आधार कार्ड नोंदणीसाठी बायोमेट्रिकच्या उपकरणाची सुविधा सर्वत्र द्यावी लागेल म्हणूनच आधार नोंदणी केंद्राची उभारणी करण्यासाठी आणखी वेळ लागेल असे ते म्हणाले. महाराष्ट्रात 95 टक्के आधार नोंदणी पुर्ण झाली आहे. उर्वरीत नागरिकांसाठी आधार केंद्राची सुविधा कायम असेल. पण बहुतांश नागरिकांकडून आता मोबाईल नंबर, पत्ता, नाव यासारख्या गोष्टींसाठी आधार अपग्रेडेशनची सुविधा वापरण्यात येत आहे. त्यामुळेच आधार अपग्रेडेशनची सुविधा पोस्टाच्या कार्यालयातून देण्यात आल्याची माहिती आधार मुंबई केंद्राचे उपमहासंचालक डॉ. संजय चहांदे यांनी दिली. आधार अपग्रेडेशनच्या सुविधेसाठी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. आधारशी संबंधित अनेक सेवांमध्ये ओटीपीच्या माध्यमातून सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आता मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.