एसटी कामगारांचे आता चड्‌डी-बनियन आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

मुंबई - चार वर्षांपासून गणवेशाचे कापड एसटी कामगारांना मिळालेले नाही. त्यामुळे शिलाई भत्ताही दिला जात नाही. याविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना 20 जुलैला विभागीय कार्यालयांसमोर चड्‌डी-बनियन आंदोलन करणार आहे. 

पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू होईपर्यंत एक एप्रिल 2016 पासून कामगारांना 25 टक्‍के अंतरिम वाढ देण्यात यावी, वाढीव महागाई भत्ता देण्यात यावा, वेळापत्रक अंमलबजावणीसंबंधात वाहतूक खात्याने एकतर्फी प्रसारित केलेले परिपत्रक रद्द करावे, चालक कम वाहक या पदामुळे एकाच कामगारावर दोन पदांचा भार येणार असल्याने या धोरणाचा फेरविचार करावा, थेट प्रवासी नसल्याच्या कारणावरून बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात आदी मागण्याही संघटनेने केल्या आहेत.