मुलुंड येथे कचरापेटीत बॉंब असल्याची अफवा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

मुंबई - मुलुंडमध्ये कचरापेटीत चमकणारी वस्तू बॉंब असल्याच्या संशयावरून आलेल्या दूरध्वनीमुळे रविवारी (ता. 16) पोलिसांची धावपळ उडाली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ती चमकणारी वस्तू चिनी बनावटीचा विजेचा दिवा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. 

मुलुंडमध्ये एका कचरापेटीत काहीतरी चमकत असल्याची माहिती प्रिया राऊल हंसरालानी हिने प्रमोद नावाच्या मित्राला दिली. त्या वेळी तिने तो बॉंब असावा, असा संशय मित्राजवळ व्यक्त केला. याबाबतची माहिती प्रमोदने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉंबशोधक आणि नाशक पथकाला पाचरण करण्यात आले. पथकाने कचरापेटीत पडलेल्या त्या गोणीतून चमकणारी ती वस्तू बाहेर काढताच तो चिनी बनावटीचा विजेचा दिवा असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स