मुंबईत कोथिंबीरची जुडी 100 रुपयांवर; शेतकरी संपाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

शेतकरी संपावर असल्याने बाजारात शेतमालासह भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचे प्रत्यक्ष परिणाम आज दिसू लागले असून भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. आज मुंबईतील बाजारात कोथिंबीरीच्या जुडी दर 100 रुपयांवर तर मेथीच्या जुडीचे दर 50 रुपयांवर पोहोचले आहेत.

मुंबई : शेतकरी संपावर असल्याने बाजारात शेतमालासह भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचे प्रत्यक्ष परिणाम आज दिसू लागले असून भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. आज मुंबईतील बाजारात कोथिंबीरीच्या जुडी दर 100 रुपयांवर तर मेथीच्या जुडीचे दर 50 रुपयांवर पोहोचले आहेत. इतर भाज्यांचेही दर वाढल्याचे चित्र आहे.

गुरुवारपासून शेतकरी संपावर गेला आहे. राज्यात ठिकठिकाणी बाजाराकडे जाणारे शेतमालाचे वाहने अडविण्यात येत आहे. परिणामी बाजारपेठेत शेतमालाचा तुटवडा जाणवत आहे. बाजारातील शेतमालाच्या आणि भाज्यांच्या भावावर गुरुवारी फारसे परिणाम दिसून आले नाही. मात्र आज भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.