पार्ल्यातील मिसळ महोत्सव पुढील वर्षी आठवडाभर 

पार्ल्यातील मिसळ महोत्सव पुढील वर्षी आठवडाभर 

मुंबई - तर्रेदार, झणझणीत मिसळ खाण्यासाठी खवय्यांनी शनिवारी व रविवारी विलेपार्लेतील लोकमान्य सेवा संघात भरलेल्या मिसळ महोत्सवात गर्दी केली होती; मात्र गर्दी व आयोजकांनी कूपन बंद केल्याने अनेकांना निराश होऊन माघारी परतावे लागले. या पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षी हा महोत्सव आठवडाभर भरवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आयोजकांनी सांगितले. 

चांद्यापासून बांद्यापर्यंत मैलान्‌मैलावर चव बदलणाऱ्या झणझणीत-चमचमीत मिसळीचे नाव उच्चारताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. ठाणे, कोल्हापूर, नाशिकपासून ते वाईपर्यंतच्या मिसळीची चव खवय्यांना एकाच छताखाली चाखता यावी, या उद्देशाने लोकमान्य सेवा संघाने मिसळ महोत्सव भरवला होता. शनिवारी, पहिल्याच दिवशी या महोत्सवास साडेतीन ते चार हजार खवय्यांनी हजेरी लावली. मैदान लहान असल्यामुळे कूपन्स बंद करण्याची पाळी आयोजकांवर आली. रविवारीही मुंबईच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या खवय्यांनी लोकमान्य सेवा संघात गर्दी केली होती. 

मिसळ आणि खवय्यांचे अतूट नाते आहे. मिसळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होतीच. तिचे नियंत्रण करण्यासाठी तयारीही केली होती; मात्र महोत्सवाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाल्याने आमचा अंदाज काहीसा चुकला. त्यामुळे काही खवय्यांची निराशा झाल्याचा खेद वाटतो. पुढील वर्षी संघातर्फे असाच महोत्सव भरवण्यात येईल. तो आठवडाभर चालेल, अशी तयारी आम्ही करू. 
- मनोज निरगुडकर, सचिव, लोकमान्य सेवा संघ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com