नायजेरियन तरुणाला मेफेड्रॉनसह अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) मंगळवारी वाडीबंदर परिसरातून 70 ग्रॅम मेफेड्रॉनसह (एमडी) एका नायजेरियन तरुणाला अटक केली.

मुंबई - अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) मंगळवारी वाडीबंदर परिसरातून 70 ग्रॅम मेफेड्रॉनसह (एमडी) एका नायजेरियन तरुणाला अटक केली.

बाथलोम राफेल चिनोसो (28) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या मेफेड्रॉनची किंमत दीड लाख रुपये आहे. बाथलोम नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहतो. तो वाडीबंदर परिसरात येणार असल्याची माहिती "एएनसी'च्या आझाद मैदान कक्षाला मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून बाथलोमला अटक करण्यात आली.

टॅग्स