समुद्रातील ऑक्‍सिजन कमी होतोय... 

 समुद्रातील ऑक्‍सिजन कमी होतोय... 

मुंबई - जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पोटातील हालचाली वाढत आहेत. एरवी पावसाळ्यात अरबी समुद्रातील ऑक्‍सिजन कमी असलेले क्षेत्र (ऑक्‍सिजन मिनिमम झोन- ओएमझेड) हळूहळू वाढत आहे. हा जागतिक तापमानवाढीचाच परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. 

अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर सप्टेंबरच्या अखेरीस मांदेली, सौंदाळी, कोळंबी, स्टिंग रे आदी मासे मच्छीमारांना मोठ्या प्रमाणावर सापडले होते. या प्रकारानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय समुद्री मासेमारी संशोधन संस्था, राष्ट्रीय समुद्र संस्था आदींनी सर्वेक्षण केले. याबाबतचा अहवाल तज्ज्ञांनी नुकताच मत्स्य विभागाला दिला. त्यात अरबी समद्रात ऑक्‍सिजन कमी असलेले क्षेत्र वाढत असल्यानेच माशांना ऑक्‍सिजनसाठी किनाऱ्याकडे धाव घ्यावी लागल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले. 

ऑक्‍सिजन कमी असलेले क्षेत्र अरबी समुद्रात वाढत असल्याची माहिती ज्येष्ठ मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. विनय देशमुख यांनी दिली. ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी असलेले क्षेत्र वाढणे ही मानवाच्या समुद्रातील वाढत्या हस्तक्षेपाची परिणती असल्याचे डॉ. देशमुख यांचे म्हणणे आहे. हा प्रकार अनपेक्षित नाही. जागतिक तापमानवाढीआधीही असे प्रकार झाले होते. 1960 मध्ये अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर मोठ्या संख्येने मासे आढळले होते, असे त्यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com