'आदर्श'ची खाती खुली करण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई - कुलाब्यातील आदर्श गृहनिर्माण सोसायटीची दोन बॅंक खाती खुली करण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. या खात्यांतील रक्कम बेहिशेबी मालमत्तेची असू शकते, असा शेराही न्यायालयाने मारला.

मुंबई - कुलाब्यातील आदर्श गृहनिर्माण सोसायटीची दोन बॅंक खाती खुली करण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. या खात्यांतील रक्कम बेहिशेबी मालमत्तेची असू शकते, असा शेराही न्यायालयाने मारला.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने सोसायटीची बॅंक खाती आणि मालमत्ता गेल्या वर्षी जप्त केली आहे. यात "आदर्श'ची स्टेट बॅंक ऑफ इंडियामधील दोन खाती आहेत. सुमारे दीड कोटी रुपये या खात्यांत आहेत; मात्र या रकमेचा गैरव्यवहाराच्या आरोपांशी काहीही संबंध नाही, असा दावा सोसायटीच्या वतीने करण्यात आला होता. बुधवारी न्यायाधीश अनिल मेनन यांच्यापुढे सोसायटीच्या याचिकेवर सुनावणी झाली. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात तपास सुरू असून, ही रक्कम बेहिशेबी असू शकते, असा दावा सीबीआयच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने याबाबत सहमती व्यक्त करून बॅंक खाती खुली करण्यासंदर्भातील सोसायटीची याचिका फेटाळली.