'पद्मावती' चित्रपटाचे प्रदर्शन अखेर लांबणीवर

'पद्मावती' चित्रपटाचे प्रदर्शन अखेर लांबणीवर

मुंबई - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त "पद्मावती' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले. एक डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला असून, प्रदर्शानाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे चित्रपटाची निर्मिती संस्था असलेल्या व्हायकॉम 18 मोशन पिक्‍चर्सकडून आज सांगण्यात आले.

आम्ही स्वखुशीने या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकत आहोत. आम्ही कायद्याचे पालन करतो. "सीबीएफसी'बद्दल आम्हाला आदर आहे.

त्यांच्याकडून आमच्या चित्रपटाला लवकरच हिरवा कंदील मिळेल, असा विश्‍वास व्हायकॉम 18 मोशन पिक्‍चर्सने प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे. भन्साळी यांच्या या चित्रपटाला राजपूत संघटनांनी विरोध केला आहे. करनी सेनेने भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना धमकी दिली आहे. सेन्सॉर बोर्डानेही काही तांत्रिक बदल करण्यासाठी हा चित्रपट निमार्त्यांकडे परत पाठवला आहे.

सेन्सॉरने चित्रपट परत पाठवला
सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच निर्मात्यांनी हा चित्रपट वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना दाखविल्याबद्दल बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी नाराजी व्यक्त केली; तसेच चित्रपटासंदर्भातील काही कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट परत निर्मात्यांकडे पाठविला असल्याचे समजते. आम्ही सर्व नियमांना बांधिल आहोत; तसेच सेन्सॉर बोर्डाचाही आम्ही आदर करतो, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले असून, लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com