पाकिस्तानने बनवल्या नव्या भारतीय चलनी नोटा 

अनिश पाटील
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नोटबंदीनंतर सर्वात मोठी कारवाई, मुंब्रा, बंगळुरू येथून 7.56 लाखांच्या नोटा जप्त 

मुंबई - बनावट नोटांवर केंद्र सरकारने नोटबंदीचा उपाय योजल्यानंतर आता पाकिस्तानने त्याचे तोड शोधले आहे. पाकिस्तानातील बनावट नोटा छापण्याच्या कारखान्यात आता दोन हजारांच्या हुबेहुब नव्या नोटा छापल्या जाऊ लागल्या असून त्यातील 7.56 लाखांच्या बनावट नोटांसह तिघांना अटक करण्यात महसुल गुप्तवार्ता विभागाला(डीआरआय) यश आले आहे. नोटबंदीनंतर बनावट नोटा पकडल्याची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

डीआरआयला ठाण्यातील मुंब्रा परिसरात आलेल्या एका 36  व्यक्ती कडे दोन हजारांच्या बनावट असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सापळा रचला असता एका संशय़ीताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन हजार रुपयांच्या 349 बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. त्याची किंमत सहा लाख 98 हजार रुपये आहे. तो मूळचा बंगळुरू येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अखेर बंगळुरू येथेही छापा टाकून त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 58 हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. अशा आरोपींकडून एकूण सात लाख 56 हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

मुख्य आरोपीच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात या नोटा बनवण्यात आल्या आहेत. तेथून बांगलादेश व पश्चिम बंगाल मालदा येथून त्या नोटा भारतात आल्याची माहिती एका अधिका-याने दिली. या नोटा एवढ्या चांगल्या प्रतिच्या आहेत की उघड्या डोळ्यांनी बनावट नोट कोणती व खरी नोट कोणती ही ओळखता येत नसल्याचे एका अधिका-याने सांगितले. 

दोन कोटींची सिगारेट जप्त

आणखी एका कारवाईत डीआरआयच्या पथकाने  गुडन  गरम सिगारेटसह  दोन तस्करांना अटक केली आहे. राजस्थानात औद्योगिक कारखान्यातून हे दोन कोटींची सिगारेट जप्त करण्यात आल्याची माहिती अधिका-याने दिली.