मुंबई : गिरगावकरांनी मानले पोलिसांचे आभार

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

गिरगावकरांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून आमचे आभार मानले. असे क्षण आयुष्यात फारच दुर्मिळ येतात. पोलिस हा जनतेचा रक्षक म्हणून ऑन ड्यूटी 24 तास कर्तव्यावर असतो. सर्वसामान्य लोकांसारखेच आम्हीही आहोत त्या मुळे आमचे सर्व पोलिस अधिकारी सहकारी कर्मचारी भारावले आहेत. या सदिच्छा भेटीचा आणि अभिनंदनाचा आम्ही मनापासून स्विकार करीत गिरगावकरांना साभार धन्यवाद देतो. कारण तुमचेही कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यात बहुमोल सहकार्य लाभले.
- संजय कांबळे पोलिस निरीक्षक

मुंबादेवी : गणेशोत्सवातील दिनरात्र बंदोबस्त आणि नागरिकांची घेतलेली सुरक्षा आणि त्या आधी मुसळधार पावसात अडकलेल्या लोकांना दिलेला मदतीचा हात या सर्व गोष्टीत वि. पि. रोड पोलिस ठाणे आघाडीवर होते.आपले कर्तव्य पार पाडताना मात्र स्वगृही असलेल्या सणाला आणि कुटुंबाला वेळ न दिल्याने घरातल्यांची नाराजी स्विकारुन गणेशोत्सव, ईद व विसर्जन मिरवणूकी शांततेत पारपाडताना केलेली धडपड आणि वापरलेले कसब या सर्वांचा मनावर आणि शरीरावर पडलेला ताण यातून थोडी उसंत मिळाल्याने पोलिस पुनःश्च आपल्या नियमीत कामात गुंतले. त्यांना एक आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का दिला.

गिरगावकरानी या सर्व गोष्टींची नागरिकांनी दखल घेत मुंबई पोलिस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गिरगावकरांच्या वतीने सुदीप नाईक यांनी आपल्या मित्र मंडळींसह व्ही. पी. रोड पोलिस स्टेशन गाठले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कांबळे व त्यांच्या सहकार्यांचे शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देत आभार मानत आपल्या सर्वांप्रती आम्ही ऋतज्ञता व्यक्त करीत आपले अभिनंदन करतो, असे म्हणत आभार व्यक्त केले. पोलिसांच्या कामाचे तोंड भरून कौतुक करीत त्यांची विशेषतः महिला पोलिसांची प्रशंसा केली. 

गिरगावकरांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून आमचे आभार मानले. असे क्षण आयुष्यात फारच दुर्मिळ येतात. पोलिस हा जनतेचा रक्षक म्हणून ऑन ड्यूटी 24 तास कर्तव्यावर असतो. सर्वसामान्य लोकांसारखेच आम्हीही आहोत त्या मुळे आमचे सर्व पोलिस अधिकारी सहकारी कर्मचारी भारावले आहेत. या सदिच्छा भेटीचा आणि अभिनंदनाचा आम्ही मनापासून स्विकार करीत गिरगावकरांना साभार धन्यवाद देतो. कारण तुमचेही कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यात बहुमोल सहकार्य लाभले.
- संजय कांबळे पोलिस निरीक्षक

Web Title: mumbai news police in girgaon