मंजुळा शेट्येंवर पोलिसांनी केला लैंगिक अत्याचार- इंद्राणी मुखर्जी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

इंद्राणी शीना बोरा हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी आहे. राज्य महिला आयोगानेही मंजुळाच्या मृत्युची दखल घेतली आहे.

मुंबई : भायखळा कारागृहात चार दिवसांपूर्वी आकस्मिक मृत्यू झालेल्या कैदी मंजुळा शेट्ये यांच्यावर पोलिसांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आज इंद्राणी मुखर्जीने विशेष न्यायालयात केला.

कारागृहातील अधिकाऱ्यांकडे हिशेबावरून बाचाबाची झाल्याच्या रागात तिला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करताना तिला विवस्त्र करण्यात आले, असेही ती म्हणाली. कारागृहातील अन्य कैद्यांनी याविरोधात आंदोलन केल्यावर त्यांच्यावरही पोलिसांनी तुफान लाठीमार केला. 

यामध्ये माझ्या डोक्याला, हाताला जखम झाल्याचेही इंद्राणी हिने सांगितले. न्यायालयाने याबाबत पोलिसांना खुलासा करण्याचे निर्देश दिले असून, वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. इंद्राणी शीना बोरा हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी आहे. राज्य महिला आयोगानेही मंजुळाच्या मृत्युची दखल घेतली आहे.

टॅग्स