प्रभात डेअरीच्या कामगारांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

तुर्भे - कामगार न्यायालयात प्रकरण असतानाही तुर्भे येथील प्रभात डेअरी लिमिटेडमधील कामगारांना व्यवस्थापनाने अचानकपणे कामावरून कमी केले. त्यामुळे कोकण श्रमिक संघ या कामगार युनियनमधील कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

तुर्भे एमआयडीसीतील प्रभात डेअरी लिमिटेड या कंपनीत व्यवस्थापनांतर्गत युनियन आणि कोकण श्रमिक संघ युनियन असे दोन गट पडले आहेत. 

पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी कामगारनेते श्‍याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील कोकण श्रमिक संघ या युनियनचे कंपनीतील ७८ कामगार न्यायालयात गेले आहेत. सोमवारी कामगार उपायुक्तांकडे यावर सुनावणी होती. परंतु सुनावणीच्या दिवशीच सोमवारी पहिल्या शिफ्टमध्ये कामावर आलेल्या कामगारांना कंपनीच्या आत यायचे असल्यास ‘आम्ही कंपनीच्या मालमत्तेची नासधूस करणार नाही’, असे लिहून देण्याचा आदेश व्यवस्थापनाने दिला. त्याला त्यांनी विरोध केल्याने कंपनीने कोणतेही कारण न देता १८ कामगारांना कामावरून कमी केले; तर काही जणांच्या बदल्या केल्या, असे रमेश शिंदे या कामगाराने सांगितले.