मैत्रिणीच्या मुलीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - "लिव्ह इन रिलेशनशिप' साथीदाराने दूरध्वनी न घेतल्याने तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या विपुल मेहता (वय 40) याला मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. 16) जन्मठेप सुनावली.

मुंबई - "लिव्ह इन रिलेशनशिप' साथीदाराने दूरध्वनी न घेतल्याने तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या विपुल मेहता (वय 40) याला मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. 16) जन्मठेप सुनावली.

मालाडच्या एका बारमध्ये काम करणारी नाझिया आणि विपुल "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये होते. विपुलने एके दिवशी पहाटे साडेचारला दूरध्वनी केला होता; परंतु नाझियाने घेतला नाही. त्यामुळे विपुल तिच्या घरी आला आणि तिची मुलगी तिया (वय 5) हिचा झोपेत गळा दाबला. तियाचा मृत्यू अपघातात झाल्याचे भासवण्यासाठी त्याने तियाचा मृतदेह मोटारीतून रस्त्यावर फेकून दिला होता. याप्रकरणी कॉल सेंटरच्या वाहनचालकासह सरकारी पक्षाने 16 साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेत, मुंबई सत्र न्यायालयाने तियाच्या खूनप्रकरणी विपुलला दोषी धरून जन्मठेप सुनावली.