आर. के. स्टुडिओची "एनओसी' रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई - चेंबूर येथील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओत अग्निसुरक्षेसंबंधी उपाययोजना न केल्याचे आढळल्यामुळे मुंबई अग्निशामक दलाने या स्टुडिओला दिलेले "ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) रद्द केले. पालिकेने याप्रकरणी स्टुडिओ व्यवस्थापनाला "कारणे दाखवा' नोटीसही बजावली आहे.

या स्टुडिओला 16 सप्टेंबरला आग लागली होती. अग्निशामक दलाने केलेल्या चौकशीत अग्निसुरक्षेसंबंधी उपाययोजना न केल्याचे आढळले होते. याप्रकरणी अग्निशामक दल संबंधितांवर खटलाही दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अग्निशामक दलाने या स्टुडिओला 2014 मध्ये "एनओसी' दिली होती; पण त्यातील सूचनांनुसार स्टुडिओच्या मालकांनी आणि व्यवस्थापनाने महत्त्वाच्या बाबींची पूर्तता केली नव्हती, असे चौकशीत आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Web Title: mumbai news r. k. studio noc cancel

टॅग्स