राहुल गांधी शुक्रवारी मराठवाडा दौऱ्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुंबई - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी (ता. 8) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नोटाबंदी, सरकारची शेतकरी विरोधी धोरणे यांसह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर पदाधिकारी आणि शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाल्याने सामाजिक आणि आर्थिक स्थिती बिकट होत आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अशा स्थितीत राहुल गांधी यांचा मराठवाडा दौरा होत असल्याने कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.

राहुल गांधी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता नांदेड येथे कॉंग्रेसच्या विभागीय मेळाव्यात मार्गदर्शन करतील. या मेळाव्यात मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील उमेदवार, जिल्हा व तालुका पदाधिकारी सहभागी होणार आहेत. पक्षांतर्गत मेळाव्यात राहुल पदाधिकाऱ्यांना आगामी राजकीय दिशा देतील, असे मानले जात आहे. दुपारी दीड वाजता ते परभणी येथे शेतकरी संघर्ष सभेला उपस्थित राहणार आहेत. येथे त्यांचे जाहीर भाषण होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर ते काय भाष्य करतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.