रेल्वे पासवरील सवलतीला मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

मुंबई - लोकलच्या मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पासचे पैसे डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे दिले, तर अर्धा टक्का सवलत देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्याची मुदत जुलैमध्ये संपत असल्याने ती 30 सप्टेंबर 2017 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे व्यवहार करण्याला प्राधान्य दिले जावे, यासाठी केंद्र सरकारने अनेक सोयी-सवलती दिल्या होत्या. ही सवलतही त्यापैकीच एक आहे.