आसनगाव रेल्वे स्थानक: अरुंद पादचारी पूल बनला मृत्युचा सापळा

asangaon railway station
asangaon railway station

कल्याण -  मध्य रेल्वेच्या आसनगाव रेल्वे स्थानकातील अरुंद पादचारी पूल आणि बगीचा मृत्युचा सापळा बनला असून तो त्वरीत हटवा त्या सोबत रेल्वे स्थानकात मुलभुत सुविधा द्या,अशी मागणी  कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे .

शहापूर हा ठाणे जिल्ह्यात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. शहापूर पासून 2 किलोमीटर अंतरावर मध्य रेल्वेचे आसनगाव रेल्वे स्थानक आहे. येथून प्रतिदिन 60 ते 65 हजार प्रवासी प्रवास करतात. महिन्याला येथून अंदाजे सुमारे 1 कोटीपेक्षा अधिक उपन्न रेल्वेला मिळते. मात्र आसनगाव रेल्वे स्थानकात सुविधेचा बोजवारा उडाला आहे

अनेक शहरातील विद्यार्थी , महिला , पुरुष या रेल्वे स्थानकातून प्रवास करत असतात त्यांच्या सोबत शेतकरी बांधव ही ठाणे आणि कल्याण शहरात भाजी पाला नेऊन विक्री करत असतात .

रेल्वे स्थानकाचे नाव आसनगाव; मात्र स्टेशन मधील आसन गायब !

आसनगाव हे रेल्वे स्थानक नाव असले तरी अनेक ठिकाणी आसने गायब आहेत तर काही ठिकाणी तुटक्या फुटके आसन असल्याने प्रवाश्याना ताटकळत उभे राहत लोकलची वाट बघावी लागते. फलाटवरील काही ठिकाणी छप्पर गायब झाले आहे.  पाणी समस्या ही अनेक वर्षे दूर झाली नाही .

बगीचा आणि अरुंद पादचारी पूल मृत्युचा सापळा ...

आसनगाव रेल्वे स्थानकात अरुंद पादचारी पुल आहे. लोकल आल्यावर प्रवाशांची चांगलीच धावपळ होते. काही जण रेल्वे लाईन ओलांडून प्रवास करतात. यावेळी फलाट जवळील बगीचाच्या बाजूने जातात आणि समोरून येणाऱ्या मेल आणि लोकल गाडीचा अंदाज न आल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे रेल्वे स्थानकात नव्याने पादचारी पूल आणि तेथील बगीचा  हटविण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे . 

एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनानंतर रेल्वेच्या समितीने आसनगाव रेल्वे स्थानकात मुलभूत सुविधा द्यावी,  अरुंद पादचारी पूल आणि बगीचा हटवावा , सुसज्ज पूल बनवावा, गाडी येताना किंवा जाताना सूचना द्यावी, आदी मागण्या केल्या असल्याची माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी संदीप उबाळे यांनी दिली. 

एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनानंतर मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांची पाहणी केली असून टप्याटप्याने तेथील आवश्यक दुरुस्ती आणि महत्वाची कामे करण्यात येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com