मुंबईत पावसाची 'रात्र'पाळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई - दिवसभर गायब असलेल्या पावसाने बुधवारी (ता. 15) रात्री मुंबईला झोडपले. या पावसात काही ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले होते. रात्री काम आटोपून घरी परतणाऱ्या नागरिकांना पावसाने दणका दिला. काही दिवस रात्रीस पाऊस होईल, असा अंदाज आहे.

दक्षिण मुंबईसह पश्‍चिम उपनगरांत रात्री दहा वाजता पावसाला सुरुवात झाली. कुलाबा, वरळी, माझगाव, वांद्रे, दादर, अंधेरी, सांताक्रूझ, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, चेंबूर, विद्याविहार, कुर्ला, घाटकोपर या ठिकाणी दमदार पाऊस झाला. पूर्व उपनगरांत जास्त पावसाची नोंद झाली. घाटकोपर येथे 70.4 मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर विद्याविहारमध्ये 67 मि.मी. पाऊस झाला. बुधवारी दिवसभरातील पावसाने सांताक्रूझच्या वेधशाळा केंद्रात 19 मि.मी. पाऊस नोंदवला गेला. गुरुवारी दिवसभर पावसाने आराम केला. काही दिवस रात्रीच पाऊस सुरू राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.