पावसामुळे घाटकोपरमध्ये झाडे कोसळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

घाटकोपर - मुंबई व उपनगरात मंगळवारी (ता. १२) मध्यरात्री ढगांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधारांमुळे घाटकोपरमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळली. घाटकोपरमधील विक्रांत सर्कल, पंतनगर, आर. बी. मेहता मार्ग, हिराचंद देसाई रोड आणि ओडियन टॉकीज येथे झाडांच्या मोठ्या फांद्या कोसळल्या. रात्रीची वेळ असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पहाटे पालिकेच्या एन वॉर्ड विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या फांद्यांची छाटणी करून बाजूला सारले. त्यामुळे पहाटे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही.

टॅग्स