राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये डिसेंबरपर्यंत सीसीटीव्ही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांनंतर प्रशासनाने या गाडीत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पश्‍चिम रेल्वेने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. पुढील महिन्यात त्या खुल्या करण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत एक्‍स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

मुंबई-दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये चोरीच्या घटना वाढल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. सीसीटीव्हीबाबतच्या निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास डिसेंबरपर्यंत वांद्रे-दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही बसवले जातील, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. पश्‍चिम रेल्वेअंतर्गत सुटणाऱ्या चार राजधानी एक्‍स्प्रेसमध्येही टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसवण्यात येतील, असेही अधिकाऱ्याने सांगितले.