प्रकाश महेता यांच्या घरावर आज मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात (एसआरए) गैरव्यवहारप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शनिवारी (ता. 5) दुपारी 12 वाजता मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कॉंग्रेसतर्फे महेता यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

एम. पी. मिल, एसआरए गैरव्यवहारप्रकरणी नाव गाजत असतानाच महेता यांनी आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला. "म्हाडा'ने परत घेतलेला भूखंड त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून विकसकाला परत दिला. त्याला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याचीही त्यांनी बदली केली. या त्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, असे निरुपम यांनी सांगितले. घाटकोपर येथील रेमंड शोरूम, कैलास टॉवर, वल्लभबाग लेन, घाटकोपर पूर्व येथून कुकरेजा टॉवरपर्यंत मोर्चा काढून निदर्शने करण्यात येतील, असे ते म्हणाले.