रिलायन्सविरोधात नागरिकांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

चेंबूर - सिद्धार्थ कॉलनीतील दोन हजारांपेक्षा अधिक झोपडीधारकांना पुनर्विकासाची स्वप्ने दाखवत विकसकाने २००६ पासून वीजबिल स्वत: भरण्याचे आश्‍वासन दिले; मात्र तेव्हापासून आजपर्यंत वीजबिलच भरले गेलेले नाही. परिणामी, काही महिन्यांपासून रिलायन्सने झोपडीधारकांची वीज कापण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी (ता. १८) रिलायन्स एनर्जीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

सिद्धार्थ कॉलनीचा विकास करण्यासाठी आरपीआयच्या बड्या नेत्याने २००६ मध्ये मध्यस्थी करत पुनर्विकासाचे व वीजबिल भरण्याचे आश्वासन दिले. तेव्हापासून आजपर्यंत विकास तर झाला नाहीच पण वीजबिलही भरले नाही. त्यामुळे झोपडीधारकांचे वीजबिल प्रत्येकी २ ते ३ लाख झाले. तीन महिन्यांचे बिल भरले नाही, तर वीजपुरवठा खंडित केला जातो. ११ वर्षांपासून रिलायन्सचे अधिकारी गप्प का, असा प्रश्‍न नागरिक करत आहेत. विकसक व रिलायन्सकडून होणाऱ्या त्रासातून सुटका व्हावी, यासाठी नागरिकांनी मोर्चा काढला. यात महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लाखो रुपयांची थकबाकी असणाऱ्या नागरिकांना तीन टक्के रक्कम भरा, असे रिलायन्स अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.