रिपब्लिकन पक्षाचा उद्या शिर्डीत मेळावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचा 60वा वर्धापन दिन मंगळवारी (ता. 3) दुपारी चार वाजता शिर्डीजवळील सावळी विहीर गावातील के. सी. पांडे मैदानात होणार आहे. या निमित्त आयोजित महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले असतील. मेळाव्याचे उद्‌घाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करतील. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार विनायक मेटे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षातर्फे देण्यात आली.