सुरक्षारक्षकावर हृदय प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई - जगण्यासाठी दोन वर्षांपासून हृदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या 39 वर्षांच्या सुरक्षारक्षकावर बुधवारी यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण झाले. या शस्त्रक्रियेसाठी लातूरहून आलेले हृदय एअर ऍम्ब्युलन्सने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर विमानतळापासून रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोअरने हृदय वांद्रे येथील रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. प्रद्योत रथ यांनी ही शस्त्रक्रिया केली. संबंधित सुरक्षा रक्षकाला शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्याने 80 टक्के खर्च रुग्णालय आणि सुमन रमेश तुलसिआनी ट्रस्टतर्फे उचलण्यात आला, अशी माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमाकांत पांडा यांनी दिली.
टॅग्स