शिवसेना काढणार महागाईविरोधात मोर्चे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर शिवसेना आता महागाईवरून भाजपला घेरणार आहे. मुंबईतील प्रत्येक विभागात शिवसेना मोर्चा काढणार आहे. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहभागाबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी शिवसेनेने प्रत्येक तालुक्‍यात घंटानाद आंदोलन केले होते. या प्रश्‍नावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता महागाईमुळे शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. 

Web Title: mumbai news shiv sena