अंबरनाथ, बदलापूरचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडेच

अंबरनाथ, बदलापूरचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडेच

अंबरनाथ, बदलापूर - अंबरनाथ व बदलापूरच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच उमेदवारांची निवड होणार आहे. 

अंबरनाथच्या नगराध्यपदासाठी मनीषा  वाळेकर व बदलापूरमध्ये विजया राऊत यांचाच अर्ज दाखल झाला असून, नगराध्यक्षपदाच्या निवडीची मंगळवारी (ता. २१) औपचारिक घोषणा होणार आहे. 

दरम्यान, शिवसेनेतील गटबाजीचा फायदा भाजपने घेऊ नये, म्हणून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सूत्रे हलवून बिनविरोध निवड करण्यासाठी पावले उचलली. विशेषतः अंबरनाथमध्ये भाजपबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसनेही शिवसेनेला निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला. अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या नेत्यांबरोबरच अन्य पक्षांचे नेतेही अर्ज दाखल करण्याच्यावेळी हजर होते. याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com