रात्री दहानंतर सायलेंट गरबा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

गोरेगाव - गणेशोत्सवात डीजे बंदीवरून निर्माण झालेल्या वादळानंतर आगामी नवरात्रोत्सवातही ध्वनिप्रदूषणाचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईत सायलेंट गरब्याची चाचपणी काही आयोजकांनी सुरू केली आहे. त्यामुळे यंदा मुंबईत अनेक मोठे गरबे रात्री १० नंतर सायलेंट झालेले दिसण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईत गरब्यावर लाखो रुपये खर्च होतात. बॉलीवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यापासून ते खान-पान व्यवस्थेपर्यंत अनेक सुविधा पुरवण्यात येतात. त्यासाठी आयोजकांकडून भलीमोठी रक्कम तिकिटाच्या स्वरूपात घेण्यात येते. ध्वनिप्रदूषणामुळे रात्री १० नंतर गरबा बंद करण्यात येतो. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींचा हिरमोड होतो. गरबा रात्री उशिरापर्यंत खेळता यावा म्हणून मुंबईतील काही बड्या गरबा आयोजकांनी त्यावर नामी शक्कल शोधली आहे. त्यामुळे पोलिसांकडून कायद्याच्या बडग्याचा त्रास होणार नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. 

जुहूतील मिलेनियम क्‍लब, ओशिवरा येथील हिरा-पन्नासह काही मॉल तसेच गोरेगाव-मालाडमधील बंदिस्त जागेमध्ये सायलेंट गरब्याची आयोजकांकडून चाचपणी सुरू आहे. सायलेंट गरब्यामध्ये गरबाप्रेमी कॉर्डलेस हेडफोनवर संगीत ऐकत रात्री उशिरापर्यंत गरब्याच्या आनंद घेऊ शकतील. नेहमीप्रमाणे रात्री १० वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रावर गरबा चालेल. त्यानंतर सायलेंट गरबा रात्री उशिरापर्यंत चालेल, अशी कल्पना काही आयोजकांच्या मनात आहे. त्यासाठी पोलिस परवानगी व अन्य सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत. 

‘ये दिल है मुश्‍कील’वरून सुचली कल्पना 
चिंचोली बंदरमधील राजमहल बंक्वेटमध्ये होणाऱ्या गरब्याचे आयोजक असलेले पी. एस. अबोली यांच्या म्हणण्यानुसार ‘ये दिल है मुश्‍कील’मधील ब्रेकअप साँगवरून आम्हाला ही कल्पना सुचली. तरुणाईला आमची कल्पना पसंतीस येईल, अशी आशा आहे.

Web Title: mumbai news Silent Garba