झोपड्यांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

तुर्भे - सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाने मंगळवारी (ता. ७) बेलापूर सेक्‍टर १० मध्ये केलेल्या कारवाईत टाटा नगरमधील झोपड्या जमीनदोस्त केल्या. दरम्यान, या कारवाईचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी घर हक्क संघर्ष समितीने केली आहे.

बेलापूर रेल्वेस्थानकाशेजारी रेल्वेमार्गालगतच्या झोपड्यांवर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाने मंगळवारी कारवाई केली. त्यामुळे येथील झोपडीवासींचा संसार आज पुन्हा उघड्यावर पडला. कडेकोट पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे झोपडीवासींनी विरोध केला नाही. परंतु, आता पंचनामा करून भरपाई देण्याच्या मागणीसाठी सिडको भवनसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे ख्वाजामियाँ पटेल यांनी दिला आहे. सिडकोने दोन दिवसांपूर्वी कारवाईची नोटीस दिली होती. त्यांनतर ‘घर बचाव संघर्ष समिती’ने न्यायालयात धाव घेत कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. याशिवाय संघर्ष समिती व रहिवाशांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई करू नये, अशी विनंती केली होती. परंतु, त्यानंतरही सिडकोने कारवाई केल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष हिरामण पगार यांनी केली आहे.

Web Title: mumbai news slum area