सौर कृषी वाहिनीचे शनिवारी उद्‌घाटन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मुंबई - शासनाचा ऊर्जा विभाग व "महानिर्मिती'च्या वतीने उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे भूमिपूजन राळेगणसिद्धी (जि. नगर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार (ता. 4) आयोजित करण्यात आला आहे.

या सोबतच उत्पादनशुल्क विभागाच्या ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून सरपंच मेळावाही आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक अण्णा हजारे राहणार आहेत. या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद्‌ व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.